भिवंडीतील प.रा.विद्यालयात भरला विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार

(म.विजय)

भिवंडी – भिवंडीत प्रसिद्ध असलेल्या प रा विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी आठवडा बाजार भरविण्यात आला होता . विशेष म्हणजे या आठवडा बाजारात वस्तूंची विक्री करण्यासाठी स्वतः शाळेतील विद्यार्थीच बसले होते . बोरं , चिंचांपासून , ते चॉकलेट भिस्कीट ,व भेळ पासून चायनीज पर्यंत आणि कांदा बटाट्यांपासून ते भाजी पाल्यापर्यंत सर्वच बाजारात मिळणाऱ्या वस्तू या आठवडा बाजारात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या . एकंदरीतच या आठवडा बाजारात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला होता . या आठवडा बाजाराचे उदघाटन जैष्ठ पत्रकार पंढरीनाथ कुंभार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले . याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती उज्वला गुळवी , भिवंडी पंचायत समितीच्या सदस्या रुचिता भोईर , जनरल एज्युकेश संस्थेचे संचालक तथा एनसीसी प्रमुख मेजर डी बी गायकवाड , सावंदे ग्राम पंचायतीच्या सरपंच रंजना पाटील , ग्राम पंचायत सदस्य चेतन चन्ने , पत्रकार नितिन पंडीत , शालेय समितीचे संचालक एकनाथ गायकवाड, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक तराळ सर , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक जाधव , पर्यवेक्षिका शुभांगी पाटील , पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता कोतकर , जैष्ठ शिक्षिका जयश्री गायकवाड यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

एकीकडे राज्यातील मराठी शाळेतील पटसंख्या कमी होताना दिसत असल्याने राज्य शासनाला शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपाय योजना अवलंबाव्या लागत आहे . मात्र राज्य शासनाच्या या योजना व निरनिराळी धरणे सहजासहजी शिक्षण क्षेत्राच्या पचनी पडत नसल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाल्यास भविष्यात मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसायाची व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी आठवडा बाजार हि संकल्पना प रा विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक जाधव शालेय समितीकडे मंडळी होती . जाधव यांच्या संकल्पनेचे दखल घेत शालेय समितीने देखील या आठवडा बाजाराला मान्यता दिल्याने मागील वर्षापासून प रा विद्यालयात हा आठवडा वर्षातून एकदा भरवला जात आहे . यंदा या आठवडा बाजाराचे हे दुसरे वर्ष असून या आठवडा बाजाराला विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती .

दरम्यान या आठवडा बाजाराबरोबरच प रा विद्यालयात कै . एन टी केळकर अंतर शालेय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते . जनरल एज्युकेशन संस्थेच्या ४६ शाळांमधील सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता . त्याचबरोबर व्यावसायिक परंपरा असलेल्या बारा बलुतेदार जातींची व त्यांच्या व्यवसायाची माहिती देणारे बारा बलुतेदार प्रदर्शन देखील यावेळी भरविण्यात आले होते. प रा विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात आले होते . ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती उज्वला गुळवी यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले . बारा बलुतेदार प्रदर्शनात प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी प्रदर्शन पाहायला येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना त्या त्या व्यवसायाची माहिती देत होते. विशेष म्हणजे लहान लहान मुले व्यवसायासंदर्भातील माहिती देत असतांना शिक्षक व पालक वर्गाकडून या मुलांचे कौतुक होत होते. तर ” पारंपरिक व्यवसायांची माहिती या मुलांना लहान वयातच झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये इतिहास , परंपरा व संस्कृतीची जोपासना व्हायला मदत होईल आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा हाच उद्देश या बारा बलुतेदार प्रदर्शनाचा आहे ” अशी प्रतिक्रिया पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्यध्यापिका सुनीता कोतकर यांनी दिली . बारा बलुतेदार प्रदर्शना साठी प रा विद्यालयाच्या जैष्ठ शिक्षिका जयश्री गायकवाड तसेच त्यांच्या सहकारी शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली . तर एकाच दिवसात हे सर्व कार्यक्रम यशस्वी आणि उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी जनरल एज्युकेश संस्थेचे संचालक तथा एनसीसी प्रमुख मेजर डी बी गायकवाड , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक तराळ सर , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक जाधव , पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता कोतकर , प रा विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email