भारत पोलाद 2019 – प्रदर्शन आणि परिषद उद्या मुंबईत 15 देशांमधल्या 250 हून अधिक कंपन्यांचा सहभाग
नवी दिल्ली, दि.२१ – भारत पोलाद 2019 प्रदर्शन आणि परिषद मुंबईत 22 ते 24 जानेवारी 2019 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. पोलाद मंत्रालयाने आयोजित केलेल्या या परिषदेत 15 देशांमधल्या 250 हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. देशपरदेशातले 10 हजार उद्योग प्रतिनिधी या परिषदेला भेट देणे अपेक्षित आहेत.
हेही वाचा :- नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट पंतप्रधानांना मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव करणार
सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव असलेल्या कंपन्या यात सहभागी होणार असून, पोलाद क्षेत्राच्या भविष्यातील विकासाबाबत यावर चर्चा होईल. पोलाद उत्पादने, तंत्रज्ञान आणि पोलादनिर्मितीत जगभरातल्या सर्वोत्तम पद्धती प्रदर्शनात पाहायला मिळतील. 2018 मध्ये भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या पोलादाचा उत्पादक देश ठरला होता.