भारत-तायपै संघटना आणि तायपै वित्तीय आणि सांस्‍कृतिक केंद्रादरम्यानच्या द्विपक्षीय गुंतवणूक कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि.२५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतातील भारत-तायपै संघटना आणि तायपै येथील वित्तीय आणि सांस्कृतिक केंद्रादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

या द्विपक्षीय करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक वाढेल तसेच दोन्ही संस्थांमार्फत होणाऱ्या गुंतवणुकीला संरक्षण दिले जाईल. द्विपक्षीय गुंतवणूक करारामुळे भारत आणि तायपै इथल्या गुंतवणूकदारांना विश्वास वाटेल आणि गुंतवणुकीला चालना मिळेल. त्याशिवाय गुंतवणुकीशी संबंधित विवाद आणि इतर समस्यांचे निराकरण केल्यामुळे गुंतवणूकस्नेही वातावरण तयार होईल. थेट परदेशी गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश म्हणून भारताच्या धोरणाला या करारामुळे पाठबळ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.