भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी १६ जुलै रोजी मुलाखत
(श्रीराम कांदु)
ठाणे दि.०१ – भारतीय सैन्यदल,नौदल,वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एस. एस.बी या परिक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,नाशिक रोड,येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रतील तरुणांनी येत्या १८ जुलै ते २७ जुलै या कालावधीत एस. एस.बी कोर्स क्र ४७ आयोजित करण्यात येत आहे. ठाणे/पालघर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी १६ जुलै रोजी मुलाखतीस हजर राहावे
सदर केंद्रामध्ये एस. एस.बी कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी काही आवशक कागदपत्रे कोणतेही एक व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावे ते म्हणजे कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंन्स अॅकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले आसवे,एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले आसवे व एनसीसी ग्रुप हेड क्वारर्टरने एस.एस.बी शिफारस केलेली असावी,टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एस.एस.बी कॅाल लेटर असावे,UNIVERSITY ENTRY SCHEME साठी एस.एस.बी कॅाल लेटर असावे किंवा एस.एस.बी शिफारस केलेल्या यादीत नावं असावे.
मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या गुगल प्लस पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग,पुणे यांची वेबसाईट व www.mahasainik.com वरील रिक्रुटमेंट बटनाला क्लिक करून त्यामधील उपलब्ध चेकलिस्ट आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काडून पूर्ण भरून आणावेत.अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र 0253-2451031,0253-2451032 संपर्क साधावा असे आवाहन छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,नाशिक रोड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर यांनी केले आहे.