भारतीय रेल्वे आणि रशियन रेल्वे यांच्यात सहकार्य करार

नवी दिल्ली, दि.०५ – रेल्वे मंत्रालय आणि रशियातली जॉईंट स्टॉक कंपनी रशियन रेल्वे यांच्यात आज सहकार्य करार झाला. भारत-रशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला. दोन्ही देशात 24 डिसेंबर 2015 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य करारात नमूद केलेल्या बाबीं सुरु ठेवण्याचा या सहकार्य कराराचा उद्देश आहे.

नागपूर-सिंकदराबाद विभागाच्या स्पीड अप ग्रेडेशन प्रकल्पाची अंमलबजावणी, मालवाहतूकीतल्या उत्तम प्रथा, दोन्ही देशात वापरण्यात येणाऱ्या उत्तम तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान यांचा या सहकार्य करारात समावेश आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email