भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे दोन दिवसीय 22वे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न
भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे दोन दिवसीय 22वे त्रैवार्षिक अधिवेशन पनवेल येथे दि: 29 व 30 अप्रिल रोजी पनवेल येथे संपन्न झाले.या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ठीक 10.30 वाजता सी.के. सजिनारायण ,भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष यांच्या हस्त झाले .या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर है प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आपल्या उद्धघाटनवर भाषणात श्री साजी नारायण यांनी वाढत जाणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली.
तसेच कामगार क्षेत्रातील प्रथम श्रमाकांची संघटना म्हणून असंघटित कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्कयता प्रतिपादन केली.बांधकाम,माथाड़ी यासारख्या कामगारांची वर्षानुवर्षे नोंदणी न करता सुरू असणारे शोषण याकडे कामगार व कौशल्य विकास मंत्री तसेच उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे नामदार संभाजी राव निलंगेकर पाटील यांनी लक्ष्य वेधले.
या सरकारने ही नोंदणी सुरु करण्याच्या कामाला प्राधान्य दिले असून त्यांचे हक्क व आर्थिक लाभ त्यांना मिळवून देण्याचे आश्वाशन दिले.
या अधिवेशनात कामगारांच्या हिताचे जे धोरणात्मक ठराव पारित होतील त्यांचा पाठपुरावा करून पूर्तता करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.संघटनेचे अध्यक्ष अण्णा धुमाल यांचे याप्रसंगी प्रस्ताविकवर भाषण झाले.संघटनेचे महामंत्री रविन्द्र देशपांडे यांचेही या प्रसंगी मागदर्शन झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डुमणे यांनी केले.
सदर कार्यक्रमास पनवेल शहारचे आमदार प्रशांत ठाकुर, महापौर सौ. सविता चौथमल उपस्थित होते. अधिवेशन प्रसंगी पारंपरिक शोभायात्रा कार्यक्रमास बगल देत पनवेल शहरातील चार प्रमुख सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. अधिवेशनास महाराष्ट्रच्या विविध जिल्हातून सुमारे २५०० प्रतिनिधी हजर होते व यांत महिलांची संख्या लक्षणीय होती.