भारतीय नौसेनेच्या ६ साहसी महिला अधिका-यांचं साहसी नौका विश्व भ्रमण अभियान संपूर्ण
भारतीय नौसेनेच्या 6 साहसी महिला अधिका-यांनी गेल्या सप्टेंबर पासून सुरु केलेले नौका विश्व भ्रमण अभियान आज पूर्ण झाले. आज गोवा येथील पणजी येथे या साहसी अभियानाचा समारोप झाला. या प्रसंगी रक्षा मंत्री निर्मला सीतारमण व नौसेनेचे एडमिरल सुनील लांबा यांनी उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन केलं.हे अभियान भारतीय महिलांनी केलेलं अश्या प्रकारच पहिलं अभियान आहे.
गेल्या वर्षी गोवा येथून 10 सप्टेंबरला भारतीय नौसेनेच्या आय एन एस बी तारिणी या नौकेने सुरु झालेल्या या विश्व भ्रमण अभियानाला रक्षा मंत्री निर्मला सीतारमण व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली होती.सदर सागर परिक्रमेत लियूटेनेंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टिनेंट कमांडर प्रतिभा जम्वाल, लेफ्टिनेंट कमांडर स्वाति, लेफ्टिनेंट विजया देवी, लेफ्टिनेंट ऐश्वर्या, आणि लेफ्टिनेंट पायल गुप्ता यांनी अभियान यशस्वी करण्यात आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं.सुमारे 200 दिवसांच्या या पूर्ण यात्रेदरम्यान या साहसी टीमने एकुण २१ हजार ६०० समुद्री मैल एव्हढे अंतर पार केले.
या अभियानादरम्यान या साहसी महिला नौदल अधिका-यांनी ६ देशांचे दौरे करत आपल्या यात्रेत त्यांनी एकुण ४ महाद्वीप (खंड) व तीन महासागर पार केले.जसे जसे त्या गोवा अर्थात ही यात्रा पूर्ण होते त्या ठिकाणी येत होत्या जणु समुद्री व्हेल,शार्क त्यांच्या समवेतच चालत आहेत असे दृष्य दिसत होते.या दरम्यान भारतीय नौसेनेची हलिकॉप्टर देखील त्यांच्या मदतीसाठी बरोबर होती.