भारताचा रुपया वधारून महागाई कमी होऊ दे; २०० डॉलरची माळ घालून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साकडे

मुंबई दि.३० – मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा रुपया वधारून महागाई कमी होऊ दे, असे साकडे घालत अंधेरीच्या राजाच्या गळ्यात २०० अमेरिकन डॉलर्सची माळच घातली. आझादनगर मनसे कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री ९:३० च्या सुमारास अंधेरीच्या राजाची मिरवणूक आली तेव्हा अंधेरीच्या राजासाठी खास २०० अमेरिकन डॉलर आम्ही मुंबईतील एका परदेशी चलन विकणाऱ्या विक्रेत्याकडून विकत घेतले होते, अशी माहिती विभागअध्यक्ष मनीष धुरी व मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी दिली.

मोदी सरकारच्या काळात लवकरच पेट्रोल आणि डिझेल शंभरी पार करण्याची शक्यता आहे. शेअर बाजार कोसळत आहे. ऐन सणासुदीला महागाईत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य जनता महागाई मुळे त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या देशाच्या रुपयांची पत कमी होत आहे. त्यामुळे देशातील महागाई कमी होऊन आपल्या देशाचा रुपया वधारू दे, आणि देशातील 100 कोटी जनतेला आणि सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन येऊ दे, या मागणीसाठी अंधेरीच्या राजालाच आता साकडे घातले असल्याचे धुरी यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email