भामट्या मकरंद आहेर ला चोरीच्या सोन्यासहित अटक
(म.विजय)
औरंगाबाद – विश्र्वभारती कॉलनीतील सुवर्णा पवार यांचे सोन्याचे दागिने चोरणारा दीर मुद्देमालासहित श्रीरामपुर तालुक्यातून जवाहरनगर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री उचलून आणला. रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर पहाटे ४ वा. अटक केली. शनिवारी त्याला कोर्टासमोर उभे केले असता २२ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
सुवर्णा पवार यांच्या घरातील कपाटातून ५ तोळ्याचा चपलाहार, दोन तोळ्याच्या पाटल्या आणि ५ ग्रॅम चे टाॅप्स मकरंद आहेर ने तीन आठवड्यापूर्वी पवार यांच्या घरी मुक्काम ठोकून लंपास केले होते.
सुवर्णा पवार या पैठण येथे प्राध्यापक म्हणून नौकरीला असल्यामुळे त्या दोन आठवड्यातून एकदा औरंगाबादेतील घरी येत असतात.मकरंद आहेर ने सोने चोरल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जवाहरनगर पोलिसांचे एकपथक श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर भागात गेले.आहेर घरातून बाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी पकडल्यानंतर आहेर ने पवार यांच्या घरातून चोरलेला मुद्देमाल चोरी करतांना वापरलेल्या हंडग्लोज मधे लपवून ठेवला होता. तो पोलिसांच्या हवाली केला. शुक्रवारी रात्री जवाहरनगर पोलिसांनी पकडून आणलेला मकरंद आहेर ने कबुली जबाब दिल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या लॉकअप मधे ठेवले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रध्दा वायदंडे करंत आहेत