भाजीवरून सासऱ्याची सुनेला मारहाण, जाब विचारणाऱ्या मुलाचाच बापाने घेतला जीव

विठ्ठलवाडी – सुनेने भाजी चांगली बनवली नसल्याच्या वादातून सासऱ्याने सुनेला बेदम मारहाण केली. त्यावेळी पत्नीला मारहाण केल्याचा जाब विचाराऱ्या मुलाचाच बापाने उशीने गळा दाबून त्याच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारल्याने मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना विठ्ठलवाडी स्टेशननजीक असलेल्या शास्त्रीनगर येथे घडली आहे.

कृष्णा शांताराम उज्जेनकर (२४) असे बापाने जीव घेतलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाची पत्नी रेखा (१९) हिच्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सासऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे. शांताराम उज्जेनकर (५०) असे अटक केलेल्या खुनी बापाचे नाव आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी स्टेशननजीक असलेल्या शास्त्रीनगरात गोपाळ समाजाची वस्ती आहे. या वस्तीमध्ये एका खोलीत मृतक कृष्णा, त्याची पत्नी रेखा व त्याचा बाप शांताराम राहतात. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री साडे दहाच्या सुमाराला आरोपी शांताराम याने सून रेखाला जेवण वाढण्यास सांगितले. रेखाने जेवण वाढून दिल्यावर आरोपी शांतारामला भाजी चव चागंली वाटली नसल्याचा जाब सून रेखाला विचारला. त्यावेळी भाजीवरून दोघामध्ये वाद होवून सासऱ्याने सुनेला बेदम मारहाण केली. बाप आपल्या पत्नीला मारहाण करत असताना मृत कृष्णाने बापाला मारहाणीचा जाब विचारला असता. आरोपी शांतारामने घरातच कृष्णाला जोरात धक्का देवून जमिनीवर पाडले. त्यानंतर एका हाताने त्याचा गळा दाबून दुसऱ्या हाताने जवळच पडलेली उशीने त्याचे तोंड दाबल्याने कृष्णा तडफडत होता. हा खुनी बाप एवढ्यावर थांबला नाही. तर त्याने त्याच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारल्याने त्याचा जीव गेला.याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सासऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यास अटक करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email