ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनि गेल्या महिन्यात भिवंडी नजीक  गणेशपुरी परिसरात झालेल्या दरोड्या प्रकरणी आठ आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 1पिस्तूल, 1 रिव्हॉल्व्हर, 2 गावठी कट्टे, 16 जिवंत काडतुसं यासह3 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम एवढा ऐवज जप्त केला .दरम्यान आरोपींची चौकशी सुउर असताना अटक आरोपींमधील एकाने  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे भाजप नगरसेवक महेश पाटील याने भाजप समर्थक नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठीतब्बल १ कोटींची सुपारी दिल्याची कबुली देत यामधील १० लाख रुपये दिल्याचे माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती .ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाअंती गणेशपुरी पोलिस स्टेशन मध्ये भादंवि कलम 120 ब , 302 सह 115 व आर्म्स ऍक्ट 325 अंतर्गत नगरसेेेवक महेश पाटील , सुजित नलावडे , यांच्यासह इतर ११ जणांवर गुन्हे दाखल केला .दरम्यान हे प्रकरण डोंबिवली मानपाडा पोलिसाकडे वर्ग करण्यात आले त्यानंतर या प्रकरनाचा तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला .याच दरम्यान  नगरसेवक महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय बाकाडे यांनी जामिनासाठी कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून  लावल्याने त्यांनी उच्च नाययलायत धाव घेत जामीन अर्ज केला होता .उच्च न्यायालयाने ही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत कल्यान जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले अखेर  आज भाजप नगरसेवक महेश पाटील आपले साथीदार सुजित नलावडे व विजय बाकाडे यांच्यासह कल्याण न्यायालयात हजर झाला .यावेळी ठाणे खंडणी विरोधी पथकाने

न्यायमूर्ती वानखडे यांच्या कडे आरोपींचा ताबा देण्यासाठी विनंती केली  असता न्यायालयाने खंडणी विरोधी पथकाला कडे ताबा दिला .ठाणे खंडणी विरोधी पथकाने महेश सह त्याच्या दोन्ही साथीदारांना ताब्यात घेतले .या बाबत ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख राजकुमार कोथमिरे यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील याने दिली होती .त्यामधील सात आरोपी यापूर्वी अटक केले आहेत तर तीन आरोपीनि जामीनासाठी हाय कोर्टात धाव घेतली होती हाय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज रद्द करत त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.त्या प्रमाणे हे आरोपी न्यायालयात हजर झाले होते आम्ही न्यायालयाला आरोपींची कस्टडी मिळावी विनंती केली होती त्या प्रमाणे आरोपींची कस्टडी मिळाली आहे आम्ही आता त्यांना ताब्यात घेतले असून उद्या कोर्टात हजर करणार असल्याचे सांगितले