भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट’-केंद्रीय मंत्री रामदास आठवले
भाजपासोबत युती करणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र, आमची भाजपासोबत निवडणूकपूर्व नैसर्गिक युती आहे.
2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली नाही, तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल, असं भाकित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये केलं. भाजपासोबत युती करणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र, आमची भाजपासोबत निवडणूकपूर्व नैसर्गिक युती आहे. शिनसेनेने भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. शिवसेना दूर गेली तरी रिपाइं मात्र भाजपासोबतच राहील, असे रिपाइं (आ.) चे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
Please follow and like us: