भाजपाच करतेय मध्यमवर्गीय हिताचे काम : रवींद्र चव्हाण

डोंबिवली : देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून ते मध्यमवर्गीयांच्या हिताचे काम करीत आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये कॉंग्रेसच्या कारकिर्दीत जी कामे होत नव्हती ती कामे आज पूर्णत्वास होताना दिसत आहेत. पण काही कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत त्याला कारण म्हणजे अपेक्षित शासन निधी सोबत जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीचा स्त्रोत निर्माण करणे गरजेचे असते ते आता होत नाही म्हणून शहरात बजबजपुरी दिसत आहे. विकास कामांना खिळ बसत आहे अशी खंत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. डोंबिवली पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यकर्ता ते राज्यामंत्री अशा रोमहर्षक प्रवासाचा संपूर्ण तपशील आणि त्याबरोबर विरोधकांचा खरपूस समाचार त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सरीपाट पत्रकारांसमोर मांडला. बंदरे, मत्स्य विकास, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्नपुरवठा या खात्यामार्फत जिल्हा-जिल्हयात विकास काम सुरु आहे.
राज्यामध्ये रस्ते वाहतूक महाग होत आहे आणि त्यामुळे महागाईचा दर वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून बंदरांचा विकास करून शासकीय जलवाहतुक करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रवास व माल वाहतूक “जेटी”च्या माध्यामतून सुरु केली आहे.
भारतनेट योजनेद्वारे १४ हजार गावे जोडली गेली आहेत. उर्वरित गावे 2018 पर्यंत जोडली जातील. आरोग्य, शाळा, ग्रामपचायत व तह्सील कार्यालये इंटरनेटमुळे जोडली जातील. यामुळे डीजिटल क्रांती होऊन प्रशासकिय कामात सुधारणा होईल. माहित तंत्राज्ञानाच्या विस्तारामुळे त्याचा फायदा असा कि मोबाईल द्वारे 243 योजना कार्यान्वित होतील.
ग्रामीण विभागात काही वेळा डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णासेवा कोलमडून पडते. त्यावर उपाय म्हणून टेलीमेडिसिन माध्यमातून रुग्णांवर इलाज केला जाईल. ज्या शाळामध्ये शिक्षकांचा अभाव आहे अशा शाळेत संगणकाद्वारे विद्यार्थ्याना शिक्षण दिले जाईल. राज्यातील रेशनीग दुकानात पॉज मशीन बसविल्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा होऊन भ्रष्ट्राचाराला आळा बसला. वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेतील डोनेशन प्रक्रियेत लायक विद्यार्थ्याना प्रवेश मिळत नसे. पण आता “नीट”च्या माध्यमामुळे काटेकोरपणा आला आहे. हृदय विकार झाल्यानंतर शल्यचिकित्सासाठी लागणाऱ्या “स्टेन्ट”ची किमत अत्यंत माफक करण्याचे काम या सरकारनी केले. डोंबिवलीत ग्रोथ सेंटर उभारणी होत असून त्यामुळे रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच पायाभूत सुविधा, प्रारूप विकास आराखडा मिळणार असून त्यामुळे सुंदर शहर निर्मित होणार आहे. पण या निर्मितीमध्ये विरोधक खो घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत उच्च पदावर असताना शासनाकडून 2650 कोटी निधी आणण्याचे काम त्यावेळी केले होते. शहरात आज जो काय विकास दिसत आहे ते त्याचेच द्योतक आहे. डोंबिवलीतील मोठागाव-माणकोली उड्डाणपूल, रिंगरोड, जोशी हायस्कूल उड्डाणपूल, वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, रस्ते कॉंक्रीटीकरण आदी कामे भाजपा शासन काळात होत आहेत.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग पूर्वी 5 हजार कि.मी. होता आता तो 20 हजार कि.मी. पर्यंत पोहचलाय मुंबई-गोवा या महामार्गावर सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्च होत आहे आणि हे सर्व केंद्रीय मंत्री गडकरीसाहेब यांच्या कुशल नेतृत्वामुळे होत आहे. देशात आणि परदेशात कोकणा संदर्भात विषय निघाला की सर्वप्रथम आदरणीय नारायण राणे यांचेच नाव घेतले जाते. त्यांनी संपूर्ण आयुष्य कोकणच्या विकासासाठी खर्च केले आहे. ते लवकरच मंत्रिमंडळात येतील, देशाचे अच्छे दिन येत आहेत, राणे साहेबांचे देखील अच्छे दिन लवकरच येणार हे निश्चित आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email