भाजपाचा महामेळावा ठरला २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचाराची अनौचारिक सुरुवात…
२०१९ मधे भाजपाचे बहुमतातील सरकार पुन्हा निवडून आणण्यासाठी अमित शहा यांची कार्यकर्त्यांसह प्रतिज्ञा
आज भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळावा २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचाराची अनौचारिक सुरुवातच ठरली .येणा-या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला बहुमत मिळवावे यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा देत भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टीकेची झोड़ उठवली .
2022 पर्यंत गरबिमुक्त भ्रष्ट्राचार मुक्त,अंधकारमुक्त असा नवा भारत घडवायचे मोदींचे स्वप्न आहे. आपण सर्व मिळुन ते साकार करूया असा आपण सर्व कार्यकर्ते संकल्प करुया.अशी घोषणा करत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांकडून भाजपाचे पूर्ण बहुमतातील सरकार पुन्हा निवडून आणायाची अशी कार्यकर्त्यांसह प्रतिज्ञा केली.यावेळी बोलताना शहा यांनी
भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं, पक्षासाठी संघर्ष केला ,
पक्षाची सुरुवात 10 सदस्यांनी झाली होती, आज अकरा कोटी सदस्य आहेत,
मोदींनी सब का साथ, सब का विकास या सूत्रानुसार काम केलं,
राहुल बाबा मोदींना साडे चार वर्षांचा हिशोब मागतात, जनता तुम्हाला चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे,
पवारांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात,
भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही, तसा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही ,
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, दोन्ही सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही,
मोदी लाट आल्यामुळे सगळे एकत्र आलेत ,
2019 ची निवडणूक आश्वासनांवर जिंकणार नाही, मोदी सरकारने केलेल्या कामावर निवडणूक जिंकणार
असे विविध मुद्दे आपल्या भाषाणात मांडले.
सत्तेसाठी सगळे लांडगे एकत्र आलेत, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका
भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला आहे.
भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे, तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना लक्ष्य केलं.
‘आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच देतो,’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी पवारांना थेट इशाराही दिला. ‘पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 मध्ये उडालेली धूळधाण लक्षात ठेवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आधी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.