भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाच्या डोक्यात फरशी घातली

डोंबिवली –  रस्त्यात सुरु असलेले भांडण सोडवणे एका तरुणाला भलतेच महागात पडले असून भांडण करणाऱ्या दोन तरुणांनी या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात फरशी घातल्याची घटना घडली .या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी अक्षय राणे व अविनाश जोशी या दोघा विरोधात गुन्हे दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
      डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली गाव पितृ छाया बिल्डींग मध्ये राहणारे प्रमोद पाटील ३५ काल रात्री दीड वाज्ण्याच्य्या सुमारास त्यांचे मित्र तन्मय निगडी ,भूषण वाघ ,गौरव जुवळे हे मोठा गाव ठाकुर्ली येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून देवी चौक येथे आपल्या कार्यालयाबाहेर आपल्या मित्रासह उभे होते .यावेळी त्यांना अक्षय राणे व अविनाश जोशी यांचे भांडण सुरु असल्याचे दिसले .दोघे ओळखीचे असल्याने पाटील याने मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र संतापेल्या अक्षय व अविनाश ने पाटील यांना ठोशा बुक्क्यानि बेदम मारहाण करत अक्षय याने पाटीलच्या डोक्यात फरशी घातली.या हल्ल्यात पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी पाटील यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अक्षय राणे व अविनाश जोशी विरोधात गुन्हे दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email