भररस्त्यात रिक्षाचालकांनी घेतली शिस्तीची शपथ … – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२१ – डोंबिवली पश्चिमेकडील मुजोर रिक्षाचालकांनी २ रुपये रिक्षा भाडेवाढ केल्याने वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग कडक कारवाई सुरुवात केली आहे. शनिवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात रिक्षाचालकांना शिस्तीचे महत्व समजावले. त्यानंतर याठिकाणी रिक्षाचालकांनी शिस्तीची शपथ घेतली. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
बेशिस्तीपणामुळे शहरात वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजले असताना अश्या रिक्षाचालकांना शिस्त लावण्यास रिक्षा युनियनचे पदाधिकारी कमी पडले आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांनी शनिवारी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात कारवाईसाठी आले असता लोढा येथे जाण्यासाठी असलेल्या अनधिकृत रिक्षा थांव्यावरील सर्व रिक्षाचालकांनी पल काढला. यावेळी काही रिक्षाचालकांना ससाणे यांनी शिस्तीचे धडे दिले. त्यानंतर रिक्षाचालकांनी शिस्तीची शपथ घेत असताना नागरिकांनी गर्दी केली. ससाणे यांच्या या कामाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. काही रिक्षाचालकांनी गणवेश परिधान केला नसल्याने त्यांना ससाणे यांनी चांगलीच समज दिली. शहरातील वाहतुकीला काही रिक्षाचालक जबाबदार असल्याची तोंडी तक्रार काही नागरिकांनी ससाणे यांना केली.