भररस्त्यात अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग दोघा विरोधात गुन्हा दाखल

(श्रीराम कांदु )

कल्याण दि.०१ – पेपर संपवून आपल्या मैत्रिणीसह घरीं जाणार्या एका विद्यार्थीनिशी एका रिक्षात असलेल्या तीन जणांनी भर रस्त्यात तिला अडवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कल्याण पूर्व विजय नगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी सदर पीडित मुलीने कोळशेवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी नुसार रोहित ,सागर व त्यांच्या एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

सदर पीडित १५ वर्षीय तरुणी कल्याण पूर्व कैलाश नगर परिसरात राहते. शुक्रवारी दुपारी सदर पीडित तरुणी आपला पेपर आटोपून मैत्रनिसह घराच्या दिशेने परतत होती. या दोघी अडीच वाजण्याच्या सुमारास काटेमानवली परिसरात रस्त्याने पायी चालत जात असताना विजय नगर परिसरात राहणारा रोहित ,सागर व त्यांच्या एका साथीदारासह रिक्षाने आला. रोहित ने पीडित मुलीच्या भोवती दोन वेळा रिक्षा फिरवली व तिच्याशी अश्लील भाषेत बोलला. इतकेच नव्हे तर त्यानंतर सदर रिक्षा चालकने त्यांना खेटून रिक्षा चालवत रिक्षात बसलेल्या रोहित ने सदर पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला .यावेळी पीडितेने प्रतिकार करत पोलिस स्थानकात तक्रार करेन असे सांगितले। असता त्याने जे करायचे ते कर आम्ही कुणाला घाबरत नाही अशी धमकी देत पीडित मुलींसह तिच्या मैत्रिणीला दमदाटी केली. या प्रकरणी सदर पीडित विद्यार्थिनीन कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी रोहित ,सागर व त्यांच्या एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email