भरधाव रिक्षा पलटली ,प्रवासी जखमी ; रिक्षा चालक पसार

डोंबीवली – भरधाव रिक्षा स्पीड ब्रेकर वर आदळून पलटी झाल्याने घडलेल्या अपघात एक प्रवासी गंभीर झाल्याची घटना डोंबिवली मध्ये घडली असून या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात रिक्षा चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार रिक्षा चालकच शोध घेत आहेत .
 डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी विनायक दर्शन इमारती मध्ये राहणारे किरण मुगणेकर २१ हे काल सकाळी पाच वाजण्याच्या सुमारस स्टार कॉलनी येथून रिक्षा पकडली या रिक्षात आधी दोन प्रवासी बसले होते .सदर रिक्षा चालक भरधाव वेगाने रिक्षा चालवत होता मानपाडा रोड गावदेवी मंदिरा नजीक रिक्षा पोहचताच हि भर धाव रिक्षा तेथील स्पीड ब्रेकर वरून उडाल्याने रिक्षा पलटी झाली या अपघात रिक्षातील दोन प्रवासी किरण यांच्या अंगावर पडले त्यांमुळे किरण यांना गंभीर दुखापत झाली .यावेळी आसपासच्या नागरिकांनी व रिक्षा चालकांनी सदर रिक्षा सरळ केली मात्र रिक्षा चालकाने हि रिक्षा घेवून प्रवाशाना तेथेच सोडून धूम ठोकली .या प्रकरणी सदर रिक्षा चालका विरोधात टिळक नगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email