भरधाव रिक्षा चा अपघात वृद्ध प्रवासी जखमी रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल
कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली रोड येथील नवपद्मिनी सोसायटी मध्ये राहणारे गोविंद महाजन गत शुक्रवारी खोणी फाटा येथून रिक्षात बसून घारडा सर्कल येथे जात होते या प्रवासा दरम्यान सदर रिक्षा चालक भरधाव वेगाने रिक्षा चालवत होता . रिक्षा हेदुटने गावाजवळ पोहचताच एका गती रोधकावर रिक्षा आदळली त्यामुळे रिक्षा चालकाचा रिक्षा वरील ताबा सुटल्याने रिक्षाचा अपघात झाला. त्यामुळे रिक्षात बसलेले महाजण हे रिक्षा बाहेर फेकले गेले या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. याच दरम्यान रिक्षा चालकाने तेथून पळ काढला. या प्रकरणी महाजन यांच्या मुलीने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.
Please follow and like us: