भरधाव रिक्षाच्या धडकेत महिला जखमी – कल्याणमधील घटना

(श्रीराम कांदु)

कल्याण दि.२८ – डोंबिवली पूर्वेकडील शेलार चौक इंदिरा नगर येथे राहणरी महिला मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आई लहान मुलगा व भावासह पेंडसे नगर रिक्षा स्थानक समोरून पायी चालत जात होत्या यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच ०५ डीएल ११२९ क्रमांकाच्या रिक्षाने त्यांना धडक दिली व सदर रिक्षा चालक येथून पळून गेला यावेळी या महिलेच्या भावाने पळत या रिक्षाचा पाठलाग करत काही अंतरावर रिक्षा थांबवली मात्र रिक्षाचालक संजय बलखंडे पळून गेला .या अपघातात सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारी नुसार रिक्षा चालक संजय बलखंडे विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email