बोलण्यात गुंतवून दुकानाच्या गल्ल्यातून २४ हजारांची रोकड लंपास – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.१३ – डोंबिवली पूर्वेकडील सत्यवान चौक उमेश नगर येथे राहणा-या लक्ष्मी कालोजी यांचे याच परिसरात किराणा मालाचे दुकानं आहे. गेल्या शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्या दुकानात एकट्या असल्याची संधी साधता दोन अज्ञात इसम दुकानात आले त्यांनी झाडू आणि कुरकुरे मागत कालोजी यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानाच्या गल्ल्यातील २४ हजारांची रोकड लंपास केली व दुकानातून निघून गेले. कालोजी यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दोन जना विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.
Please follow and like us: