बॉलिवूडच्या किंगखानचा आज बर्थ-डे
बॉलिवूडच्या किंगखानचा आज बर्थ-डे असून जगातील दुसरा सर्वात श्रीमंत अभिनेता असलेल्या शाहरुखचं बालपण मात्र हलाखीच्या परिस्थितीत गेलं. शाळेची फी भरण्यासाठीही त्याच्याकडं पैसे नसायचे.
चित्रपट आणि जाहिरातींमध्ये दिसणारा शाहरुख मोठ्या उद्योगपतींच्या मुलांच्या लग्नात डान्स परफॉर्मन्स करतानाही दिसतो. एका लग्नात अर्ध्या तासासाच्या डान्ससाठी शाहरुखनं तब्बल आठ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. ‘माझं घर चित्रपटांमुळं नाही, तर लग्नातील डान्स परफॉर्मन्समुळं चालतं’ असं शाहरुखनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.
पडद्यावर नेहमी हसणारा आणि इतरांना हसवणारा शाहरुख खऱ्या आयुष्यात मात्र भावनिक आणि हळवा आहे. आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देताना अनेकदा तो बाथरुममध्ये जाऊन रडत असे, हे गुपित शाहरुखनं मुलाखतीत सांगितलं होतं.
शाहरुख हा अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मोठा चाहता असल्याचं सर्वांनाच माहित आहे. एका मुलाखतीत शाहरुखनं अनोखी इच्छा बोलून दाखवली होती. ‘तूझ्यासारख्याच एका सुंदर मुलीला तू जन्म दे; कारण मला माझ्या मुलाचं तिच्याशी लग्न लावायचं आहे’ अशी इच्छा शाहरुखनं माधुरीजवळ व्यक्त केली होती.