बॉम्बची अफवा पसरविणाऱ्याला ५ महिन्यानंतर अटक

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – पाच महिन्या पूर्वी आपल्या आईची गाडी चुकू नये यासाठी एका तरुणाने ट्रेन मध्ये चक्क बॉम्ब असल्याची अफवा उठविली.या तरुणा विरोधात रेल्वे पोलिसानी गुन्हा दाखल केला होता .अखेर ५ महिन्या नंतर श्रवण कुमार या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केले आहे..श्रवण हा वांगणी येथे राहणारा आहे.
एक बैंकेत मॅनेजर या पदावर कार्यरत श्रवणकुमार हा वांगणी येथे राहतो. त्याच्या आईला २८ जानेवरी रोजी पाटण्याला जायचे होते. त्यासाठी त्याने उद्योगनगरी एक्सप्रेसमध्ये तिकीट आरक्षण केले होते. कल्याण रेल्वे स्थानकातून ही गाडी सायंकाळी साडेपाच वाजता होती. श्रवणच्या आईला रेल्वे स्थानकात पोहचण्यासाठी उशीर होत होता . आईची गाडी सुटु नये. ती थांबून राहावी यासाठी त्याने रेल्वे गाडीत बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. ही गाडी तब्बल तीन तास खरडी स्टेशन जवळ थांबवण्यात आली होती. कल्याण ते खर्डी या मार्गा दरम्यान सगळ्य़ाच गाडय़ा तीन तास उशिराने धावल्या.मिळालेल्या मोबाइल नंबरचा आधारे फेक कॉल करणा-याचा शोध पोलिसांनी सुरू केला अखेर माहिती समोर आली तो तरुण श्रवणकुमार होता त्याने हे कृत्य केल्याची कबूली दिली. गुरुवारी दुपारी पोलिसांनी त्याला रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Please follow and like us: