बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर खात्यास कळवल्यास एक कोटी रुपये बक्षीस
केंद्र सरकारच्या नव्या योजनेप्रमाणे बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर खात्यास कळवल्यास ती कळविणार्यास एक कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. बेनामी ट्रॅझेक्शन्स इन्फर्मेट्स रिवार्ड स्कीम, 2018 अंतर्गत हे बक्षीस देण्यात येणार आहे. मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार परदेशी नागरिकदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.या योजनेविषयीची पूर्ण माहिती प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्थमंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर खात्यामधील इन्व्हेस्टिगेशन डायरेक्टोरेट यांच्यासमोर दिल्यास सदर व्यक्तीस एक ते पाच कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. बेनामी ट्रॅझेक्शन्स इन्फर्मेट्स रिवार्ड स्कीम, 2018 अंतर्गत हे बक्षीस देण्यात येणार आहे. मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार परदेशी नागरिकदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. बेनामी संपत्तीविषयी माहिती देणार्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असून संपूर्ण कार्यवाही अतिशय गुप्ततेने करण्यात येणार आहे. या योजनेविषयीची पूर्ण माहिती प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.त्याचप्रमाणे सरकारतर्फे करचुकवेगिरीची प्रकरणे उघडकीस आणल्यासदेखील त्या व्यक्तीस 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सरकारने 1961च्या प्राप्तिकर कायद्यानुसार सदर बक्षीस योजना सुरू केली आहे.