बीडमध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मध्ये ५८ गुन्हेगारी वस्त्यांची झडती

बीड – जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी रात्री १० ते गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबविण्यात आले. यामध्ये तब्बल ५८ गुन्हेगारी वस्त्यांची झडती घेण्यात आली. तसेच जुगार, दारू अड्डयांवर धाडी टाकून कारवाया करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशावरून जिल्ह्यात सर्वत्र आॅल आऊट आॅपरेशन मोहीम राबविण्यात आली.

ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४५२ वाहनांची तपासणी करून ८८ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २७ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला. तसेच ८ दारूबंदी व दोन जुगार अड्डयांवर धाडी टाकण्यात आल्या. २०४ पैकी १०५ हॉटेल व लॉजची तपासणी करण्यात आली. ११७ जणांना समन्स तामील केल्या. ८६ जणांना वॉरन्ट देण्यात आले.

अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीसस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विशेष पथके, स्थानिक पोलीस यांचा या मोहीमेत सहभाग होता, असे पोनि घनश्याम पाळवदे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email