बीडमधील घाटसावळीत शेतकरी आत्महत्या

बीड – शेतकर्‍यांच्या आत्महत्येच सत्र सुरू असून तालुक्यातील घाटसावळी येथील एका तरुण शेतकर्‍याने काल विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली. घाटसावळी येथील भारत आबासाहेब लांडे नामक ३० वर्षीय तरुण शेतकर्‍याने काल सायंकाळी सातच्या दरम्यान कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विषारी औषध प्राशन केले.

सदर घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान रात्री पावणे बारा वाजता त्यांचे निधन झाले. लांडे यांच्याकडे सात एकर शेती होती. स्टेट बँक ऑफ इंडिया व खासगी सावकाराचे कर्ज असल्याचे कळते आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email