बिल्डरच्या कार्यालयात घरफोडी सव्वा दोन लाखांची रोकड लंपास – डोंबिवलीतील घटना

कल्याण दि.०६ – डोंबिवली पुर्वेकडील निळजे येथील लोढा हेवन मधील द्वारका बंगल्यात गजानन पाटील राहतात पाटील बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे लोढा हेवन परिसरात कार्यालय आहे. शुक्रवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कार्यलय बंद करून घरी निघून गेले. मात्र रात्रीच्या सुमारास कार्यलयाला कुलूप असल्याची संधी साधंत अज्ञात चोरट्याने त्यांच्या कार्यलयाचे कुलूप तोडून कार्यलयात असलेले २ लाख २२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. शनिवारी सकाळी कार्यलय उघडले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सूरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email