बिल्डरच्या कार्यलयाची तोड फोड ,कर्मचार्यांना शिवीगाळ करत दिली धमकी बाप लेकावर गुन्हा दाखल

कल्याण दि.३० – कल्याण नजीक असलेल्या आंबिवली येथील वडवली गावात निर्मल लाईफ स्टाईल याचे बांधकाम सुरु असून तय ठिकाणी त्याचे कार्यलय आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारे राजेश पाटील व त्यांचा मुलगा या कार्यलयात आले ,या दोघांनी लोखंडी रोड ने कार्यालयाची तोडफोड करत सामानाची नुकसान केले तसेच प्लास्टिक च्या बाटलीत आणलेले काळे द्रव्य कार्यलयात ओतले व कर्मचार्यांना शिवीगाळ करत पैसे मिळाले नाही तर बघून घेईन अशी धमकी दिली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात राजेश पाटील व त्याच्या मुला विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी या दोघा बापलेका विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email