बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक
कातडीची किंमत सुमारे ८ लाख रूपये
(म.विजय)
ठाणे – ठाणे गुन्हे शाखा वागळे इस्टेट यूनिट ५ ने बिबट्याच्या कातडीसह दोघांना अटक केली आहे.सदर कातडीची किंमत सुमारे ८ लाख रूपये आहे.
गुन्हे शाखा यूनिट 5 चे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पवार यांना 23 में रोजी सकाळी 6:00 वाजता 2 जण डिसूजा वाडी रोडवर स्वागत हॉटल समोर बिबट्याची कातडी विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती.सदर प्रकरणी त्यांनी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना कळवले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बारामती येथील मुढाले गावातील निवासी मोहन मल्हारी सकाटे व बारामतीच्याच मोर गावातील निवासी शिवदास भालचंद्र पोटे याना बिबट्याच्या कातडीसह अटक केली.सहायक पोलीस आयुक्त मधुकर पांडे गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त प्रताप दिधावकर, पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलिस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे,सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पवार पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास तुनगेंवार, पोलिस हवलदार दिलीप शिंदे, शिवाजी रायसिंह, पोलिस हवलदार सुनील सोननिग यांनी सदर कार्रवाई यशस्वी केली.