बिकट आर्थिक परिस्थिीतीमुळे अकरा वर्षात पालिकेची वृक्षगणना नाही

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०९ – राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार प्रत्येक महापालिकेने दर पाच वर्षानी आपल्या क्षेत्रातील वृक्षगणना करणे आवश्यक आहे. मात्र सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थितीच बिकट असल्याने २००७ नंतर गेल्या अकरा वर्षात वृक्षगणना करण्यात आली नाही. या संदर्भात चौकशी केली असता एका अधिकार्याने याला खाजगीत दुजोरा दिला.

२००७ मध्ये करण्यात आलेली वृक्षगणना एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती. यामध्ये आठ दहा वनस्पतीशास्त्रातले पदविधर होते आता जर पुन्हा वृक्षगणना करायची असेल तर किमान प्रत्येक झाड मोजण्यासाठी २५ ते ३० रुपये खर्च अपेक्षित आहे. २००७ मध्ये केलेल्या वृक्षगणनेनुसार महापालिकाक्षेत्रात अडीच लाख नोदणी झाली होती व सध्या सुमारे पाच लाखापेक्षा जास्त वृक्ष असल्याचे एका तज्ञ व्यक्तीने सांगीतले आणि आता गणनेचा खर्च सुमारे दिड कोटी रुपयापर्यत होण्याची चिन्हे आहेत. तत्कालिन आयुक्त पी वेलारासु यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्रधिकरण समितीची सभा झाली त्यावेळी हा विषय चर्चेला आला असता यासाठी होणारा खर्च जास्त असून तो आता परवडणारा नाही असे सांगून त्यानी तो बाजूला ठेवल्याचे एका नगरसेवकाने सांगीतले.

२००७ मध्ये जी वृक्षगणना करण्यात आली. त्यामध्ये समितीने अनेक महत्वाच्या सूचना केल्या होत्या पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले व त्यांची अंमलबजाणीही केली नाही. सध्या आरोग्य विषयक नागरिक जास्त जागरुक झाले असल्याने वैद्यकीय वृक्षारोपणाला अधिक प्रधान्य द्यावे अशी शिफारस केली होती. शिवाय पर्यावरण अहवालात वायु प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक सहकारी निवासामध्ये व दुकानादाराने किमान एक झाड लावावे व जोपासावे अशी सूचना करण्यात आली आहे पण याकडे कोणीच गांभीर्याने घेण्यास तयार नाही असे दिसते. कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रात असलेले कारखाने,होणारे वायु प्रदुषण लक्षात घेऊन वृक्ष जोपासनेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email