बालकामगार प्रकरणी गॅरेजमालका विरोधात गुन्हा दाखल
डोंबिवली – गॅरेज मध्ये काम करण्यासाठी अल्पवयीन मुले ठेवल्याने एक गॅरेज मालकाविरोधात कोळशेवाडी पोलीस स्थानकात गॅरेज मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे .जयसिंग नथु गावडे असे या गॅरेज मालकाचे नाव आहे .
कल्याण पुर्वेकडील चिंचपाडा रोड परिसरात राहणारे जयसिंग गावडे यांचे याच परिसरात गॅरेज आहे .या गॅरेज मध्ये किशोरवयीन मुले काम करत असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यलयाच्या पथकाला मिळाली होती .या माहितीनुसार या पथकाने काल या गॅरेज वाद धाड टाकली असता त्त्याना या ठिकाणी किशोर वयीन मुलं काम करत असल्याचे निदर्शनास आले .त्यांनी या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यलयचे अधिकारि नरेंद्र तेलम यांनी बाल न्याय बालकाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम75,79व बाल व किशोर वयीन कामगार प्रतिबंध व नियमन सुधारित अधिनियमन 2016 चे कलम 3 (अ)प्रमाणे तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी जयसिंग नथु गावडे विरोधात गुन्हा दखल केला आहे .