बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार,दुपारी १ पासून ऑनलाइन निकाल पाहता येतील
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार असून दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येतील.राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी सदर परीक्षा दिली आहे.बोर्डाने मंगळवारी दुपारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली. बुधवारी म्हणजेच उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. परंतु दहावीच्या निकालाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Please follow and like us: