बस मध्ये चढताना मोबाईल हिसकावुन चोरून नेला

डोंबिवली – गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरात चोरीच्या अनेक घटना घडल्या. अशाच एका घटनेत बस मध्ये चढताना तरुणीच्या हातातून मोबाईल हिसकावुन चोरून नेण्याची घटना पलावा बसस्थानकाजवळ घडली आहे. ही घटना सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली.सलोनी तांबे या ठाण्याला जायला निघाल्या होत्या. पलावा बसस्थानका जवळ उभ्या असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी तांबे यांच्या हातातून मोबाईल हिसकावुन तिथून पळ काढला. तांबे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरु आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email