बनावट चावीने कुलूप उघडून घरफोडी
कल्याण – कल्याण पूर्व खडेगोळवली येथील रामकृष्ण कॉलनी येथील चाळीत राहणारी महिला शनिवारी सायंकाळच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप बनावट चवीने उघडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी सदर महिलेने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: