बनावट कॉलसेंटर व्दारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक ; दोघांना अटक

ठाणे-बनावट कॉलसेंटर द्वारे अमेरीका स्थित नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणा-या दोन जणांना पोलिसांनी अटक केलिय.राकेश अनिल कोंड्वाणी (२१) व जोरावत शेरसिंग राजपूत (२८)अशी त्यांची नावे आहेत.
बनावट कॉलसेंटर द्वारे संपर्क करून अमेरीका स्थित नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याची खबर ठाणे शहर परिमंडळ ५ चे उपयुक्त सुनील लोखंडे यांना मिळाली होती यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.ढोले,पोलीस निरीक्षक पी.एन.उगले,सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बि.पाटील ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोठारे,पोलीस हवालदार अंकुश पाटील,तसेच कर्मचारी राणे,खाबडे,पाटिल,खानजोड़े,प्रवीण घोडके,दीपक बरले यांनी घोडबंदर रोड विभागात छापा टाकला.राकेश अनिल कोंड्वाणी (२१) व जोरावत शेरसिंग राजपूत (२८)याना यावेळी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लँपटोप व ४ मोबाईल जप्त करण्यात आले.या साहित्याद्वारे अमेरीकेतील नागरिकांना संपर्क करुन आपण अमेरिकेतुनच बोलत असल्याचे भासवून आरोपी त्यांना कर्जाचे आमिष दाखवत असत.आणि त्यांच्याकडून प्रोसेसिंग फिच्या नावाखाली विविध मार्गांनी पैसे उकळत असत.यानंतरही कर्ज मिळवुन न देता त्यांची फसवणूक करत असत.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग ,सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग सत्य नारायण ,पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे ,सहाय्यक पोलीस आयुक्त महादेव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर करवाई करण्यात आली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email