बँकेत नोकरीच्या आमिश दाखवत महिलेला गंडा
कल्याण दि.२६ – रायगड येथे राहणा-या एका महिलेला भामट्याने बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून एकूण ४० हजारांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी कोमल पाटील व त्यांच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- मनसेच्या अजून एका पाठपुराव्याला यश,सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त झाल्याने स्त्रीवर्गाला फायदा
सदर पिडीत तरुणी रायगड येथे राहत असून तिची कोमल पाटील व तिच्या साथीदारा समवेत फेसबुक वर ओळख झाली. त्यांनी या तरुणीला तुला पनवेल येथील एका बँकेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत मंगलवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास कल्याण बस स्थानकावर भेटण्यासाठी बोलवले त्या ठिकाणी भेटल्या नंतर या दोघांनी सदर पिडीत तरुणीला एतिएम मधून पैसे काढण्यास सांगितले.
हेही वाचा :- महाराष्ट्रमध्ये जनतेसाठी आंदोलने करणाऱ्या ‘मनसे’ सैनिकांचे अभिनंदन – राज ठाकरे
त्यानंतर कल्याण कोर्टात नेत स्कॉनिग करण्याचा बहाणा करत सदर तरुणी कडून सोण्याचे दागिने काढून घेतले व तिचे नजर चुकवून तेथून पळ काढला. बराच वेळ वाट पाहून हि हे दोघे न परतल्याने या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तिने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी कोमल पाटील व तिच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.