फ्लॅट दुकान विकत देण्याचे आमिश दाखवून ३५ लाखाना गंडा 

कल्याण – मुबंई वडाळा येथे राहणाऱ्या शकिल शेख 41 या बांधकाम व्यवासायिकला कल्याण पुर्वेकडील तिसगाव परिसरात तुलसी अपार्टमेंट मध्ये राहणारे तुकाराम धुरी व अनिल आचारी यांनी 2015 साली दुकान आणि फ्लॅट विकत देतो असे आमिष दाखवले .त्यापोटी या दोघांनी त्यांच्याकडे 35 लाख रुपयांची मागणी केली .शेख यांनि या दोघाना 35 लाख देऊ केले .मात्र पैसे देऊन तीन वर्ष उलटूनही अद्याप फ्लॅट व दुकान न मिळाल्याने शेख यांनी त्यांना विचारले असता या दोघांनी उडवा उडवी ची उत्तरे  दिल्याने शेख याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्ररकणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी तुकाराम धुरी व अनिल आचारी या दोघा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email