फ्लॅटचे आमिष दाखवून व्यावसायिकाला २७ लाखांना गंडा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०९ – फ्लॅट चे आमिष दाखवत एका बांधकाम व्यासायिकाने एका इसमाला तब्बल २७ लाखाना गंडा घातल्याची घटना घडली आहे .
कल्याण पुर्वेकडील लोकधारा संकुलातील सह्याद्री सोसायटी मध्ये राहणारे हंसाराम चौधरी हे व्यासायिक असून गत वर्षी त्यांना मनमोहन राणावत याने बिल्डिंग च्या बांधकामासाठी 27 लाख रुपये मागत त्या मोबदल्यात तुम्हाला हजार स्क्वेअर फूट फ्लॅट देतो असे आमिष दाखवले. मात्र सहा महिने उलटूनही राणावत याने फ्लॅट न दिल्याने चौधरी यांनी पैसे परत मागितले. राणावत याने त्यांना चेक दिले मात्र ते चेक ही बाऊन्स झाले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी मनमोहन राणावत विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: