फेसबुकच्या माध्यमातून गिफ्ट देण्याच्या बहाण्याने ३५ हजारांना गंडा
डोंबिवली – फेसबुक च्या माध्यमातून मैत्री करत गिफ्ट चे आमिष दाखवत एका महिलेला दोन जणांनी तब्बल ३५ हजारांना गंडा घातल्याची घटना कल्याणात समोर आली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात वृदावन वाटिका सोसायटी मध्ये राहणारे सुमन सिंग ४८ या महिलेला जॉन केनेडी नावाच्या इसमाने फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत मैत्री केली फेसबुक च्या माध्यमातून सिंग यांच्या चेतिंग करत त्यांनी ओळख वाढवली काही दिवसांनी या दोघांनी सिंग यांना लंडन येथून गिफ्ट पाठवतो असे आमिष दाखवले तसेच कस्टम चे पैसे भरावे लागतील असे सांगितले तसेच व डॉली नावाच्या महिलेने सिंग यांच्या मोबाईल वर फोन करत त्यांना कस्टम ऑफिस मध्ये बोलत असल्याचे भासवत त्यांना ३५ हजार रुपये भरण्यासाठी बँक खाते नंबर दिला .सिंग यांनी या खात्यावर पैसे भरले मात्र पार्सल न आल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी जॉन केनेडी व डॉली नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे .