फुलपाखरु चोरांना अटक
ठाणे- अबालवृद्ध अशा सर्वांचेच आकर्षण ठरलेल्या ठाण्यातील स्ट्रीटगार्डन येथील फुलपाखरू अज्ञात चोरट्यानी चोरून नेले होते .सदर चोरांना पकडून पोलिसांनी ते फुलपाखरू हस्तगत केले आहे.याप्रकरणी पोलिसांनी निहाल जंगबहादुर सिंग (२४) व गोविंद नरमु चौहाण (२२) या दोघांना अटक केली आहे.
स्ट्रीटगार्डन येथे लहान मुलांना फळे ,प्राणी,यांची माहिती मिळावी यासाठी ठाणे पालिकेने तेथे कृत्रिम प्रतिकृती बसवल्या होत्या .यातील हे फुलपाखरू सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते.परंतु ते फुलपाखरू अज्ञात चोरट्यानी चोरून नेले .याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता .चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरु केला. चितळसर पोलीसांनी तपास करुन याप्रकरणी निहाल जंगबहादुर सिंग (२४) व गोविंद नरमु चौहाण (२२) या दोघांना अटक केली आहे.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज मुकणे पुढील तपास करत आहेत.