प्लॉट देण्याच्या आमिष दाखवत २० लाखांना गंडा
डोंबिवली – गुजरात येथे दोन प्लॉट देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाला दोन भामट्यांनी तब्बल २० लाखांना गंडवल्याची घटना कल्याणात उघकीस आली आहे या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात दखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी जुगल ठक्कर ,राहुल ठक्कर या दोन जना विरोधात गुन्हा दखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .
कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क नजीक मंगेशीधाम सोसायटी मध्ये राहणारे अभिजित मानवी यांना आंबिवली येथे राहणारे जुगल ठक्कर ,राहुल ठक्कर या दोघांनी गुजरात येथील कच येथे दोन प्लॉट घेवून देतो असे आमिष दाखवत मानवी कडून तब्बल २० लाख रुपये उकळले .मात्र पैसे दिल्या नंतर चार महिन्यांचा कालावधी लोटला मात्र प्लॉट ण मिळाल्याने मानवी यांनी या दोघांना मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा नंबर लागत नव्हता तर ते राहत असलेळे घर हि ते सोडून गेले होते त्यामुळे मानवी यांना आपली फसवणूक झाल्यचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी जुगल ठक्कर ,राहुल ठक्कर या दोघा भावा विरोधात गुन्हा दखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे .