प्रियांका चोप्रा व निक जोनस दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा
प्रियांका चोप्रा व निक जोनस या कपलच्या लग्नाची चर्चा सुरू झालीयं. तर इकडे प्रियांका आपल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी झाली. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही दोघांनीही जमेल तसे लग्नाचे प्लानिंग सुरू केले आहे. आयुष्यातला9 लग्नाचा दिवस सर्वार्थाने खास असावा, अशी दोघांचीही इच्छा आहे. साहजिकचं लग्नाच्या स्थळापासून, लग्नाच्या निमंत्रणपत्रिकांपर्यंत सगळे काही खास करण्यावर त्यांचा भर आहे. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. निकला समुद्र प्रचंड आवडतो. त्यामुळे याचठिकाणी हे जोडपे लग्नगाठ बांधेल, याची शक्यता अधिक आहे. हे लग्न कसे होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. पण हा सोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने होईल, असे मानले जात आहे.