प्रियंका चोप्राचे पुस्तक पुढील वर्षी बाजारात उपलब्ध होणार
आता प्रियंका चोप्रा अभिनयासोबतच साहित्याच्या दुनियेतही पाऊल ठेवत आहे. प्रियंका आजपर्यंत ज्या विषयांवर कधीच बोलली नाही, त्या विषयांवर ती यात लिहिणार आहे. या पुस्तकाचे पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रकाशक असतील. पेंग्विनने अलीकडेच या पुस्तकाची घोषणा केली. पेंग्विनच्या मते, प्रियंकाच्या या पुस्तकातील शब्द मुलींना स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायक ठरतील. हे पुस्तक केवळ भारतातच नाही तर अमेरिका आणि ब्रिटनमध्येही प्रकाशित होईल.
आपल्या अभिनय क्षेत्रातील प्रवासादरम्यानच्या अनेक आठवणी, अनुभव प्रियंकाने शब्दबद्ध केल्या आहेत आणि त्या पुस्तकरूपात आपल्याला लवकरच वाचायला मिळणार आहेत. तिच्या या पुस्तकाचे नाव ‘अनफिनिश्ड’ असे असेल. प्रियंकाच्या आठवणी, तिच्या आयुष्यातील काही घटना आणि बऱ्या वाईट अनुभवांचा संग्रह यात असेल. प्रियंकाचे हे पुस्तक पुढील वर्षी बाजारात उपलब्ध होईल.