प्राचीन मूर्तीचे रक्षण करणारा नाग पाहण्यासाठी उसळली गर्दी
(म.विजय)
परळी – अंबाजोगाई रोड वर कन्हेरवाडीच्या अलीकडे असलेल्या एका डोंगराचे खोदकाम चालू असताना एक पुरातन मुर्ती सापडली असुन त्या मुर्तीभोवती एक भला मोठा नाग वेटाळे घालून बसल्याचे खोदकाम करणार्याला दिसून आले. ही वार्ता सगळीकडे पसरताच ही मुर्ती व नाग पाहण्यासाठी लहान थोर महिला यांची गर्दी उसळली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, परळी पासून जवळच असलेल्या कन्हेरवाडीच्या अलिकडील डोंगरचे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून त्यातून निघालेली माती , दगड धोंडे, मुरुम परळी ते अंबाजोगाई केंद्रीय राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. त्या कामासाठी ह्या मुरुम व मातीचा वापर करण्यात येत आहे.सोमवार, दि.१६ रोजी सकाळी १० वाजता जेसीबीने डोंगर माथा पासून ते जमीन नी पर्यंतच्या २५ फुट खाली अंतरावर प्राचीन मुर्ती आढळून आली. त्या मुर्तीच्या पठोपाठच अचानक एक भला मोठा नाग मुर्ती जवळ वेटाळे घालून बसला. जेसीबी चालकाने पुन्हा डोंगर खोदण्याचा प्रयत्न केला असता. त्या भल्या मोठ्या नागाने आपला फणा वर करून जोराचा फुत्कार सोडला हे दृश्य पाहून जेसीबी चालकाने जेसीबी मागे घेऊन पळ काढला व जेसीबी गेल्यानंतर तो नाग मुर्ती ला वेटाळे घालून बसला ही वार्ता सर्वत्र पसरताच तेथे बघ्यांची गर्दी उसळली असुन सदर ठिकाणी परळीचे तहसीलदार शारद झाडके, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, मेजर गर्जे तसेच परळीतील पत्रकार बाधवांनी भेट देऊन पहाणी केली.