प्राचार्यांचा नियुक्ती कालावधी निर्बंधमुक्त असावा ! – जगन्नाथ पाटील

डोंबिवली दि.०८ – प्राचार्य महाविद्यालयाच्या भवितव्यासाठी सतत झटत असून तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अपार कष्ट करीत असतात. परंतु कालमर्यादेच्या अडचणीमुळे काही वेळा त्यांना महाविद्यालय सोडून जावे लागते. त्यामुळे महाविद्यालया बरोबर काही वेळा विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. यासाठी पदवीत्तर महाविद्यालयामधील प्राचार्यांचा नियुक्ती कालावधी निर्बंधमुक्त असावा असे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपा नेते जगन्नाथ पाटील यांनी डोंबिवलीत केले.

डोंबिवलीतील प्रगती कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक महाजन यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या कार्यक्रमात पाटील अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी प्र कुलगुरू डॉ. नरेशचंद्रा, माजी प्राचार्य डॉ. सिध्येश्वर गडदे, प्रगती कॉलेजच्या उपाध्यक्षा पुष्पलता पाटील, शंकरकाका भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील मॉडेल कॉलेज, स्वामी विवेकानंद, डी.के.वी.सी. कॉलेज, सरस्वती महाविद्यालय, डोंबिवली स्वयंसिद्धी इंन्स्टीटयूट, आदर्श महाविद्यालय, एन.के.टी. कॉलेज आदी महाविद्यालयातील प्राचार्यांनी सत्कारमूर्ती अशोक महाजन यांना शब्दसुमनाने गौरव करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email