प्रस्तावित उच्च शिक्षण आयोग कायद्याअंतर्गत मंत्रालयाला अनुदान देण्यासंबंधीचे अधिकार देण्याबाबतचे वृत्त दिशाभूल करणारे
नवी दिल्ली, दि.०३ – प्रस्तावित उच्च शिक्षण आयोग कायद्याअंतर्गत मंत्रालयाकडे अनुदान देण्यासंबंधीचे अधिकार देण्याबाबतचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले.
अनुदान प्रक्रिया ही कमीत कमी मानवी हस्तक्षेप आणि पारदर्शकता व कार्यक्षमता सुनिश्चित करणारी गुणवत्ता आधारित ऑनलाईन वस्तुनिष्ठ पद्धती असावी यासाठी सरकार आग्रही आहे. अशा प्रकारच्या प्रणाली IMPRINT आणि RUSA यासारख्या मोठ्या योजनांच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येत असून यूजीसीच्या योजनांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.
Please follow and like us: