प्रवाशाची लाखो रुपयांचे दागिने असणारी बॅग परत मिळाली
राजरत्नम अरुनमयनायक नाडार हे त्यांच्या परिवारासह ठाणे स्टेशन येथून रिक्षात बसून सुभाषनगर पोखरण रोड नं 2 ठाणे, येथे त्यांच्या भावाकडे आले परंतु त्यांचेकडे असलेली बॅग ही रिक्षात विसरून राहिल्याने सदर तक्रारदार हे चितळसर पोलीस ठाण्यात आले त्यांनी दिलेल्या त्रोटक माहितीच्या आधारे तात्काळ पोउपनि/ कदम व पोशि/ 3390 पाटील यांनी ते ज्या ठिकाणी रिक्षातून उतरले तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले, परंतु फुटेज मध्ये रिक्षाचा 6514 असा पुसट नंबर मिळाला त्याआधारे मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे ठाणे परिसरात रिक्षाचा तपास करून रिक्षा क्र एम एच 04 जेएच 6514 व त्या वरील चालक यांना बॅगेसह ताब्यात घेतले बॅगेत दोन चैन वजन अंदाजे 100 ग्रॅम किंमत अंदाजे ३,२५,००० अशी हस्तगत करण्यात आले आहे.सदरची बॅग व त्यातील चैनी तक्रारदार यांचे ताब्यात देण्यात आलेली असून पो उ नि सुधिर कदम हे पुढील चौकशी करीत आहेत.