प्रदूषण मंडळाचा अहवाल आल्याशिवाय गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाही ओम साई गणेश मित्र मंडळाचा निर्णय

डोंबिवली दि.२३ – डोंबिवली जवळील दावडी गावातील ओम साई मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणेशाची मूर्ती कालवंडली आहे.त्यामुळे जो पर्यंत प्रदूषण मंडळाचा अहवाल येत नाही तो पर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाही असा निर्णय मंडळाने घेतला आहे.

हा प्रकार घडल्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने या मंडळाच्या जवळ प्रदूषण मापक मशीन लावले आहे. मात्र प्रदूषणाचा निर्णय येण्यास दोन दिवस लागणार आहे. विसर्जन काही तासांवर येऊन ठेपल्याने मंडळाच्या या निर्णयाने गणेश भक्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, जर बापाच्या मूर्तीवर काळे डाग पडले असून प्रदूषण मंडळाने प्रदूषणाचा अहवाल दोन दिवसांनी मिळणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे जो पर्यत प्रदूषण मंडळाचा अहवाल येत नाही तो पर्यत आम्ही गणेशाच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन करणार नाही. मात्र गणेशाच्या छोट्या मूर्तीचे विसर्जन करू. दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी ह्या मंडळाला भेट दिली. प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या बेजबाबदार पणा आणि वेळकाढूपणा बद्दल नाराजी व्यक्त करत मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम , मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे यांनी यावेळी दिला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email