पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाला मारहाण करणा-या तीन जणांना अटक

मुंब्रा – पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाला मारहाण करणा-या तीन जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबद्दल अधिक वृत्त असे की मुंब्रा येथील एका रूमच्या मालकी हका संदर्भात न्यायालयात खटला सुरु आहे.या घराच्या मुळ मालक असलेल्या ८० वर्षीय महिला त्या घरात शिरल्याने घरात राहणा-यांनी नियन्त्रण कक्षाला कळवले.यानंतर त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात आणले असता हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने पोलिसांनी त्यांना जाण्यास सांगितले.याचा राग येवून फिरोज खान,मोझम खान व अरबाज खान यांनी पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला मारहाण केली.या प्रकरणी  या तिघांना  अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.