पोलीस कोठडीतून नाट्यमय रित्या आरोपी पसार ,तासाभरात पुन्हा गजाआड डोंबिवली पोलीस स्थानकातील प्रकार

कल्याण दि.०३ – पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत एका आरोपीने पोलीस स्थानकातील पोलीस कोठडीतून पळ काढल्याची घटना डोंबिवली पोलीस स्थानकात घडली आहे. लाल बहादूर यादव असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी तासाभरात पुन्हा त्याला अटक केली या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. चोरीच्या गुन्ह्यातील लालबहादूर यादव या आरोपीला डोंबिवली पोलिसांनी अटक केली होती.

न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती . शनिवारी सायंकाळच्या सुमारास यादव पोलीस कोठडीत असताना आपल्याला घाम येतोय घाबरल्या सारखे होते आहे असे सांगत मोठ मोठ्याने ओरडन्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलीस कर्मचा-याने त्याला कोठडीतून बाहेर काढत पंख्य खाली बसवले. साडे सात पोलीस कर्मचारी कामात व्यस्त असल्याचे संधी साधत त्याची नजर चुकवून यादव याने तेथून पळ काढला. हि बाब लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग करत त्याला डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात गाठत त्याच्या मुसक्या आवळल्या.

डोंबिवली पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डोंबिवली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यादव मला त्रास होतोय भीती वाटते असे बोलत मोठ मोठ्याने ओरडू लागल्याने त्याला कोठडी बाहेर काढून पंख्यां खाली बसवले होते त्याच्यावर पोलीस कर्मचारी नजर ठेवूण होते मात्र त्यांची नजर चुकवून त्याने पळ काढला मात्र अर्ध्या तासात पुन्हा गजाआड करण्यात आले असे सांगितले . पोलीस कोठडीतून पळालेला सराईत आरोपी सुदैवाने पुन्हा पोलिसांच्या हाती लागला मात्र घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आता आरोपीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांना सुरक्षा पुरवायची का असा सवाल उपस्थित झाला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email